Breaking News

सदाचारी समाजासाठी वारकरी विचार पथदर्शी -जिल्हाधिकारी कवडे

अहमदनगर, दि. 04 - मागील चार वर्षापासून पंढरीच्या आषाढी यात्रेसाठी निघालेल्या वारकरी विठ्ठल भक्तांच्या सेवेसाठी नगर प्रेस क्लबच्या वतीने औषेधी किटचे वितरण करण्यात येत आहे. पत्रकारितेबरोबरच सामाजिक उत्तर दायित्वाच्या  भावनेतून सुरु असलेली प्रेस क्लबची वारकरी सेवा कौतुकास्पद असल्याचे सांगतानाच जात, धर्म भेदरहीत  तुम्ही आम्ही खेळीमेळी या संत वचनाचे अनुकरण करीत सर्वांच्या कल्याणासाठी वारकरी वारीला जातात. सर्वांचे कल्याण व्हायचे असेल तर ती जबाबदारी ही सर्वांचीच आहे. यासाठी योजना सरकारने आणली, प्रशासनाने राबविली तरी ती ज्यांच्यासाठी आहे. त्या समाजाने योजना मनपुर्वक स्विकारुन टिकवावी असे उद्घगार महंत भास्करगिरी महाराज यांनी काढले.
नगर शहर प्रेस क्लबच्या वतीने प्रती वर्षाप्रमाणे अध्यक्ष मन्सूरभाई शेख यांच्या पुढाकाराने पंढरी यात्रेसाठी निघालेल्या देवगड दिंडीतील वारकर्यांना औषधी किटचे वितरण जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते करण्यात आले. इमामपूर घाट पायथ्यानजिक दिंडीच्या विश्रांती स्थळावर हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी महंत भास्करगिरी महाराज बोलत होते. यावेळी आमदार शिवाजीर कर्डिले, आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, पत्रकार महेश महाराज देशपांडे, सचिन देसरडा, जालिंदर बोरुडे यांच्या सहीत वृत्त वाहिन्याचे प्रतिनिधी, वृत्त छायाचित्रकार व वारकरी मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना पत्रकार महेश महाराज देशपाडे यांनी नगर प्रेस क्लबच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी जिल्हाधिकारी कवडे यांच्या हस्ते प्रेस क्लबच्या वतीने प्राथमिक उपचाराचे  50 औषधी किट महंत भास्करगिरी महाराज यांच्याकडे पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव - तुकाराम च्या गजरात सुपूर्द करण्यात आले.