Breaking News

मेहकर येथे भा.ज.पा.व डॉक्टर्स असोसिएशनतर्फे वृक्षारोपन

मेहकर (प्रतिनिधी), दि. 04 - भविष्यात दुष्काळ पडू नये,भारतात हरितक्रांती यावी.,शेतकरी आत्महत्या होवू नये,ही काळाची गरज ओळखून सर्व नागरीकांना वृक्ष लागवड करण्याचे आवाहन केले.त्याचाच परिणाम म्हणून मेहकर शहरातील डॉक्टर्स व भाजपा पदाधीकारी एकत्र येवून बस स्टॅण्ड नजीक सोनाटी रोड च्या दुतर्फा वृक्षाची लागवड केली.
या वेळी डॉक्टर्स असोसिएशन चे अध्यक्ष डॉ.अनिलजी गाभने, भाजपा शहरध्यक्ष प्रल्हादजी लष्कर, डॉ.अमीतजी जोशी, भाजपा च्या स्त्री शक्ति जेष्ठ महिला नेत्या सौ.अर्चनाताई पांडे, डॉ.शरदजी लखोटीया, डॉ.प्रमोदजी जाधव, अल्पसंख्याक आघाडी शहराध्यक्ष आजीमजी जहागीरदार, राजेशजी निकम, किरण सुरेश जोशी दुष्काळ निवारण समिती अध्यक्ष सीतारामजी ठोकल, शहर उपाध्यक्ष नंदूभाऊ सदावर्ते, संजय शर्मा, अविनाशजी नावाडे, समाधानजी बोडखे, रोहीतजी सोलंकी, या सह अनेक भाजपा पदाधीकारी व डॉक्टर्स हजर होते.