Breaking News

भाजपमुळे देशात सामाजिक धृवीकरण ः मुकूल वासनिक




बुलडाणा, दि. 04 - संघटनेची जबाबदारी म्हणजे जनसेवा करण्याची मोठी संधी आहे. आमदार बोंद्रे यांना मोठा जनाधार असुन त्यांच्याकडे सत्ता, सेवा, संंघर्ष अशा सर्व बाबी आहेत. त्यामुळे अतिशय जबादारीने ते जिल्हाध्यक्षपदाची भुमिका पार पाडतील असा विश्‍वास अ.भा.काँग्रेस कमीटीचे महासचिव मुकूल वासनीक यांनी व्यक्त केला. बुलडाणा येथील गद्रे सभागृहात आमदार बोंद्रे यांचा जिल्हाध्यक्षपदाचा पदग्रहण सोहळा मोठया उत्साहात पार पडला. मुकुल वासनिक यांच्या हस्ते जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष विजय अंभोरे यांचा सत्कार करून नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांच्यावर पदभार सोपविण्यात आला. असा दुंहेरी कार्यक्रम मोठया उत्साहाने गेर्द्रे सभागृहात संप्पन्न झाला. कार्यक्रमाला प्रदेश काँगेे्रस कमिटीचे सरचिटणीस शामभाउ उमाळकर, संजय राठोड, नानाभाउ गावंडे, बुलडाणा आ.हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार दिलीप सानंदा, जि. प. अध्यक्षा अलकाताई खंदारे, माजी आमदार जनुभाउ बोंद्रे, बाबुराव पाटील, मनोज कायंदे, तब्बसुम हुसेन यांची प्रमुख उपस्थिती होती.
  याप्रसंगी बोलतांना मा. मुकुलजी वासनिक यांनी सांगितले की,  बुलडाणा जिल्हयाची पक्ष संघटना ही अतिशय मजबुत संघटना आहे. जिल्हयामध्ये राज्यात सर्वाधिक म्हणजे 51000 हजार सदस्य नोंदणी झाली आहे. यासबोतच बी.एल.ओ ची नोंदणी देखील राज्यात सर्वाधिक आहे. ही खरच अभिनंदनीय बाब आहे. काँग्रेसच्या काळात देश हा सामाजीक सलोख्यासोबत विकासातही अगे्रसर होता. पंरतू भाजपाने अच्छे दिनचे स्वप्न नागरिकांना दाखविले. त्याचा विसर भाजपाला पडला असून याबददल पक्षाध्यक्ष अमित शहा सांगतात की, तो एक प्रचाराचा मुद्या होता हे जनतेची थटटा उडविल्यासारखेच आहे. तसेच केंद्र सरकारचे मंत्री हे बेजाबदारीचे वक्तव्य करित आहेत. यापासून देशात विकेंद्रीकरण होत असून देशाच्या सामाजिक एकेतेचे धृवीकरण होवून देश विकासाला मुकतो आहे. ही बाब अतिशय काळजीदायक असून आपण रस्त्यांवर उतरूण या बददल आवाज उठविला पाहिजे. काँग्रेस पक्ष हा गोरगरिबांचा, शोषितांचा कष्टकर्‍यांचा पक्ष आहे. कॉग्रेसने सदैव सर्वांप्रती न्यायाची भुमिका जोपासली आहे. तसेच आज माजी जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे यांचा कार्यकाळ संपून आ. बोंद्रे यांनी पदभार स्विकारला आहे जिल्हयात पक्षवाढीसाठी ते सर्वोतोपरी पर्यतक् करतील असा विश्‍वास व्यक्त करित त्यांना नव्या जबाबदारीच्या शुभेच्छा दिल्या. माजी जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, मला जिल्हाध्यक्षपदाच्या कार्यकाळा सर्व पदाधिकार्‍यांची साथ लाभली यापूसन मला अनेकांना न्याय देता आला. या मदतीमध्ये पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आमदार बोंद्रे यांचा सिहांचा वाटा होता असे सांगत शुभेच्छा दिल्या.
पक्षाचे दिवस हे आंदोलन करण्याचे असून, काँग्रेस पक्षाने देशाला स्वांतत्र मिळवूनच दिले नाही तर ते सदैव अबाधित ठेवण्याचे कामही पक्ष करीत आहेत. पक्षाची भूमिका जनमानसापर्यंत पोहचविण्याचे काम जिल्हाध्यक्ष हे करित असतात.  ही महत्वची जबाबदारी मा. मुकुलजी वासनिक साहेबांनी माइयावर सोपविली असून मी त्यांच्या नेतृत्वात जिल्हयात पक्ष संघटनेची मोठी ताकद उभी करणार आहे. जिल्हयाला जिल्हाध्यक्षांचा एक मोठा इतिहास आहे. या सर्वापासून मी चांगले गुण घेवून मी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करील. संघटनेचे काम अतिशय दमदार पणे सुरू करणार असून लोकहितासाठी प्रसंगी जेलमध्ये जाण्यची सुंध्दा माझी तयारी आहे. पक्षाला गतवैभवाचे दिवस आणण्यासाठी पक्षापासून एकही कार्यकर्ता दुर जाणार नाही याची पुर्णपणे काळजी घेणार आणि यातून पक्षाची मोठी ताकद उभी करून आगामी काळात होणार्‍या निवडणूकामध्ये पक्ष यश संपादन करेल असा विश्‍वास व्यक्त करत आपल्या सर्वाच्या सहकार्यातुन मजुबत असे संघटन उभे करण्यासाठी परिश्रम घेणार असल्याचे याप्रसंगी आ. बोंद्रे यांनी सांगितले. समारंभात आ. हर्षवर्धन सपकाळ, माजी आ. दिलीप सानंदा, हाजी रशीद खा जमादार,लक्ष्मण घुमरे, मुक्तीयारसिंग राजपुत, संजयजी राठोड, शामभाउ उमाळकर, नाथाभाउ गावंडे, जनुभाउ बोंद्रे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
पदग्रहण सोहळयाला जि.प. सभापती अकुशराव वाघ, गणेश बस्सी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील, प्रा. नरेंद्र खेडेकर, नंदाताई कायंदे, अनिताताई रणगावरे, मिनलताई अंबेकर, लक्ष्मणराव घुमरे, अरविंद कोलते, रामविजय बुरंगले, दिलीपराव जाधव,बलदेवराव चोपडे, भास्कर ठाकरे, प्रदिप नागरे, श्याम डांबरे, नंदुभाउ बोरे, सभापती विष्णु पाटील, जि.प.सदस्य अशोकराव पडघान, रशिद खा जमादार, माजीद कुरेशी, बाळाभाउ भोंडे, दिलीपराव जाधव, मुक्त्यारसासिंग राजपूत, दिपक रिंढे, समाधान हेलोडे, वा.रा. पिसे, प्रकाश धुमाळ, यांच्यासह सर्व तालुका अध्यक्ष, डॉ. सत्येंद्र भुसारी, डॉ. देवकर, शिवदास रिंढे, राजु पाटील, वसंतराव देशमुख, सर्व ता.कॉ.काँग्रेसचे अध्यक्ष, जि.प.सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, पं.स. सभापती, पं.स.सदस्य यांच्यासह आजी माजी पदाधिकारी यांच्यासह जिल्हयातील कॉगे्रस पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने होते. प्रास्ताविक प्रकाश पाटील अवचार, आभार इरफान पठाण यांनी तर संचलन प्रा. सुनिल सपकाळ यांनी केले.