आमची बदनामी करु नये : चीन
बीजिंग, दि. 04 - भारताने चीनच्या भूमिकेचा चुकीचा अन्वयार्थ काढून चीनची बदनामी करु नये, असे मत या चीनमधील ग्लोबल टाईम्स या सरकारी वृत्तपत्राच्या माध्यमामधून व्यक्त करण्यात आले आहे. भारतास आण्विक इंधन पुरवठादार गटामध्ये (एनएसजी) सदस्य म्हणून प्रवेश न मिळू देण्यामागे चीनने कळीची भूमिका बजावली होती. मात्र एनएसजीबरोबरच क्षेपणास्त्र तंत्रज्ञाण नियंत्रण करार व्यवस्थेचे (एमटीसीआर) सदस्यत्व भारतास मिळाल्याचे नुकतेच निष्पन्न झाले आहे. चीनला मोठ्या राजनैतिक प्रयत्नानंतरही एमटीसीआरचे सदस्यत्व मिळविण्यात यश आलेले नाही. या पार्श्वभूमीवर चीनच्या माध्यमामधून गेल्या काही दिवसांपासून भारतास लक्ष्य करण्यात येत आहे.
