विरोधकांमुळे शहराचा विकास खुंटला ः अभिषेक कळमकर
अहमदनगर, दि. 04 - पुणे, नाशिक, औरंगाबाद मधील राजकारणी निवडणुकीपुरते पक्षीय राजकारण करीत असल्यामुळे त्या शहरांचा विकास झाला. परंतु नगर शहरा मध्ये वर्षानुवर्षे विकासकामांत राजकारण केल्यामुळे नगर शहर विकासापासून वंचित राहिले. मात्र, आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 2 वर्षांपासुन विकासकामांचा धडाका लावल्यामुळे शहराच्या विकासाला चालना मिळाली आहे, असे प्रतिपादन महापौर अभिषेक कळमकर यांनी केले.
प्रभाग 4 व 5मधील चैतन्य हॉटेल ते गांधीनगर ते निंबळक रोडपर्यंत सभागृहनेते कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ कोनशीला अनावरणाने महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी नगरसेवक स्वप्नील शिंदे, सागर बोरुडे, संपत बारस्कर, निखील वारे, जितू गंभीर, बबन वाकळे, दत्तू वाकळे, ज्ञानदेव कापडे, तुकाराम कातोरे, बाळासाहेब वाकळे, पडोळे, अण्णा इथापे, कडुस, सातपुते, साधना बोरुडे, रंजना उकिर्डे, रेखा जरे आदी उपस्थित होते.
कळमकर पुढे म्हणाले की, सभागृहनेते कुमार वाकळे यांनी नागापूर, बोल्हेगाव या खेड्यांना शहरीकरणाचे रूप देण्याचा प्रयत्न केला. वरील रस्त्यासाठी वाकळे यांनी पाठपुरावा करून केला. हे काम 1 कोटी 4 लाख रुपयांत होणार आहे. विरोधकांनी शहरामध्ये 25 वर्षे जातीधर्माचे राजकारण करून जनतेला वेठीस धरले. मात्र, शहरातील जनता आता विकासकामांबरोबर आली आहे. आम्ही विकासाकामांत पक्षीय राजकारण कधीही आणणार नाही, असे ते म्हणाले.वाकळे म्हणाले की, 25 वर्षे उपनगराचा रखडलेल्या विकासाला आता चालना मिळाली आहे. निवडणुकीमध्ये मी जे शब्द दिले होते, ते 2.5 वर्षांतच पूर्ण करू शकलो. या रस्त्यामुळे या परिसरातील रहदारीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. सागर बोरुडे यांनीही या कामासाठी प्रयत्न केले. आमदार संग्राम जगताप यांच्यामुळे आम्ही जनतेची सेवा करू शकलो. आमच्यावर जो विश्वास टाकला, तो प्रामाणिकपणे विकासातून दाखवून दिला, असे ते म्हणाले.