Breaking News

जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीची सभा वादळी ठरली

। विरोधकांनी केले सत्ताधार्‍यांवर आरोप । भरतीमध्ये नातेवाईकांनाच संधी । जागा खरेदीतही घोटाळा

अहमदनगर, दि. 04 - अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंकंडरी टीचर्स को-ऑपरेटीव्ह के्रेडीट सोसायटी लिमिटेड, अहमदनगरची वार्षीक सर्वसाधारण सभेमध्ये आरोप प्रतिआरोप केल्याने सभा चांगलीच रंगली होती. आरोप प्रतिआरोप करीत सत्ताधार्‍यांना सर्वांनी धारेवर धरले. 
यावेळी अप्पासाहेब शिंदे, बाळासाहेब राजळे, बाबासाहेब बोडखे, शैला जगताप, सुनिल जगताप, सुनिल दानवे, तुषार शिंदे, राजेंद्र लांडे, तोडमल सर, नंदकुमार शितोळे, अरविंद देशमुख आदिनी प्रश्‍नांचा भडिमार करुन सळो की पळो करुन सोडल होते. सर्वसाधारण सभेला वाद विदाचे स्वरुप आले होते. यावेळी विरोधकांची मागणी होती की, चेअरमन यांनी उत्तरे दिली पाहिजे परंतु मात्र, चेअरमन यांनी उत्तरे न देता सत्ताधारी मंडळाचे नेते यांनी उत्तरे दिल्याने मोठा गोंधळ उडाला होता.
यावेळी सभासदांनी सत्ताधार्‍यांना धारेवर धरताना भ्रष्टाचाराचा आरोप करत झालेली भरती अयोग्य असल्याचा आरोप केला. तसेच भरती प्रक्रिये बाबत  चौकशी होवून योग्य कारवाई व्हावी अशी मागणी केली. तसेच सध्या केलेली भरती अयोग्य असुन भविष्यात कपात होणार असल्याचे सांगीतले. झालेली नोकरी भरती ही बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आला.  तसेच रंगरंगोटी, बांधकाम करताना कोणत्याही प्रकारच्या निविदा मागवण्यात न आल्याने चाललेला कारभार हा मनमाने कारभार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
तसेच संचालक मंडळाची होणार बैठक ही येथुन पुढे ऑन कॅमेराघेण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.