Breaking News

सोयगांवच्या जलयुक्त शिवारामुळे पंचक्रोशीत हरीतक्रांती घडणारः जिल्हाधिकारी

बुलडाणा (प्रतिनिधी)  दि. 04 - कमी पाऊस अन् गत वर्षाचा अत्यल्प जलसाठा त्यामुळे दुष्काळाचे भीषण वास्तव संपुर्ण राज्याने यंदा अनुभवले. शासनाचा ‘फलॅग शिप’ प्रोग्राम ठरलेल्या जलयुक्त शिवारातील लोकसहभागाची किमया सोयगांवामध्ये पहावयास मिळाली. जालींधर बुधवत यांच्या नेतृत्वातील हा सकारात्मक बदल पंचक्राशीत निश्‍चीतच हरीतक्रांती घडवेल असा आशावाद जिल्हाधिकारी डॉ.विजय झाडे यांनी व्यक्त केला.
जलयुक्त शिवार योजना कार्यक्रमांअतर्गत सोयगांवच्या परीसरात साखळी पध्दतीने झालेले सिमेंट बांधार्‍याचे कामे, आणि लोक सहभागातून 1 कि.मी. नदी खोलीकरण अन्य जलसंधारणाची कामे यांची पाहणी करण्यासाठी आपल्या नियोजित दौर्‍यात जिल्हाधिकारी आले होते. नेमका काल परवा, पुरपाणी झाल्याने कामांच्या पाहणीसह जलपूजनांचा योग साधता आला. जलयुक्त परिसर पाहून समाधान व्यक्त करत लोकसहभागाच्या कामांचे विशेष  कौतुक डॉ.झाडे यांनी केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत यांनी गावातील विकास कामांची माहिती डॉ.झाडे यांना दिली. जिल्हाधिकार्‍यांनी सोयगांवमध्ये जलयुक्त अंतर्गत आणखी काम करण्यासाठी निधीची उपलब्धता करुन देण्याची ग्वाही दिली. यावेळी उपविभागीय अधिकार तिडके, राजु मुळे, राहूल सोळंके, समाधान बुधवत, उदयभान तायडे, कौतीकराव वासे, रंगनाथ बुधवत, शत्रृघ्न कचाटे, अशोक तायडे, जगन्नाथ मांटे, शिवहरी मांटे, विश्‍वनाथ पिंपळे, विश्‍वनाथ बुधवत, गणेश बुधवत, समाधान सोनुने, ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.