उत्तरप्रदेशच्या निवडणुकीसाठी प्रियांका गांधींच्या नेतृृृत्वाखाली 150 सभाचे आयोजन : काँग्रेस
नवी दिल्ली, दि. 04 - उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रियांका गांधी उतरणार आहेत. यासाठी त्यांचे 150 सभांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसच्या जनसंपर्क विभागाचे चेअरमन सत्य देव त्रिपाठी यांनी दिली.
2017 ला उत्तरप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी काँगेसकडून आतापासूनच तयारीला लागले आहेत. राष्ट्रीय स्थरावरून रणनीती आखले जात आहे. प्रियांका गांधी यांच्याकडे प्रचाराची सुत्रे येणार असल्याने काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेसमध्ये फसरलेले मरगळपणा काढण्यासाठी प्रियांका गांधींची गरज भासणार आहे. काँग्रेसला एका नवीन चेहऱयाची आवश्यकता आहे. यासाठी वरिष्ठ पातळीवरून अंतिम रूप देण्यात येत आहे, असेही त्रिपाठी यांनी स्पष्ट केले. मोदींमुळे बॅकफुटावर गेलेल्या काँगेसला प्रियांका गांधींमुळे यश मिळेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.