Breaking News

15 आँगस्टपर्यंत गावे हागणदारी मुक्त करा : डॉ. देशमुख

सातारा, दि 4 (प्रतिनिधी) : 15 आँगस्टपर्यंत सातारा तालुका हागणदारी मुक्त करण्याचा निर्धार ग्रमसेवकांनी केला आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांनी याची प्रेरणा घेवून तसे प्रयत्न करावेत, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ. राजेश देशमुख यांनी दिली. 
स्वच्छ भारत अभियानांतर्गत सातारा पंचायत समितीमध्ये अद्यापही हागणदारी मुक्त न झालेल्या ग्रामपंचायतींविषयी आढावा तसेच नियोजनविषयी बैठक घेण्यात आली. त्यावेळी डाँ. देशमुख मार्गदर्शन करत होते. बैठकीला उपमुख्य कार्यकारी आधिकारी चंद्रशेखर जगताप, गटविकास आधिकारी सचिन घाडगे उपस्थित होते.
194 ग्रामपंचायतीपैकी 101 ग्रामपंचायती 2015-16 मध्ये हागणदारी मुक्त झालेल्या आहेत   42 ग्रामपंचायतींचे 2016-17 या वर्षात हागणदारी मुक्त प्रस्ताव पडताळणीसाठी सादर केले आहेत. उर्वरित 51 ग्रामपंचायती 15 आँगस्टपर्यंत हागणदारी मुक्त करणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी सचिन घाडगे यांनी प्रास्ताविकात दिली. सातारा तालुका हागणदारी मुक्त करण्याबाबत ग्रामपंचायत पातळीवरील नियोजनविषयी ग्रामसेवकांचा सविस्तर आढावा उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप यांनी घेतला
1 एप्रिलनंतर 1200 शौचालये पूर्ण केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ. देशमुख यांनी ग्रामसेवक, सरपंचांचे अभिनंदन करून ते पुढे म्हणाले, स्वच्छ भारत अभियान प्रत्येक गावात प्रभावीपणे राबवा ग्रामसेवक, सरपंच, पदाधिकारी आणि संपर्क अधिकारी यांनी एकजुटिने परिश्रम करावेत. शौचालय नसणार्‍या कुटुंबांना भेटी देवून त्यांना शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करावे सार्वजनिक शौचालये स्वच्छ व नीट नेटके राहतील यासाठी ग्रामसेवकांनी सतर्क रहावे. 15 आँगस्टपर्यंत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती हागणदारी मुक्त करण्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. बैठकीस विस्तार अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते.