Breaking News

विद्याचा मराठी सिनेमाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री विद्या बालन मराठी सिनेमात काम करत असून तिचा एक अलबेला या आगामी मराठी चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. अभिनेता भगनावदादांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. शेखर सरतांडेल दिग्दर्शित एक अलबेला या चित्रपटात अभिनेत्री विद्या बालन गीता दत्ता आणि अभिनेता मंगेश देसाई भगवानदादांची भूमिका साकारणार आहेत. या आगामी मराठी चित्रपटात विद्याच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेली उत्सुकता फर्स्ट लूकनंतर आणखीनच वाढली आहे.