Breaking News

जुहू किनार्‍यावर 30-35 फुटांचा मृत मासा


मुंबई, 29 - जुहूच्या समुद्रकिनार्‍यावर ब्रुडीज व्हेल जातीचा मासा मृतावस्थेत आढळला. हा मासा साधारणपणे 30 ते 35 फूट लांबीचा असून त्याचे वजन तब्बल 20 टन असल्याचे कळते.
समुद्राला भरती असल्याने किनार्‍यावर येत असलेला हा मासा वाळूत रुतून बसला. या माशाला क्रेनच्या सहाय्याने हटवण्यात येणार आहे. वनखात्याकडून रात्रभर या ठिकाणची पाहणी सुरु होती. तसेच या माशाच्या शरीरावर अनेक जखमा आहेत. त्याचा मृत्यू कसा झाला आणि तो किनार्‍यावर कसा आला याचा तपास सुरु आहे. या आधी सात ते दहा फूट लांबीचे अनेक मासे मुंबईच्या समुद्र किनार्‍यावर आले आहेत.